न्यू होरायझन्सने पाठवले प्लुटोचे छायाचित्र

nasa
वॉशिंग्टन – प्लुटो ग्रहाचे ऐतिहासिक छायाचित्र अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने १९ जानेवारी २००६ मध्ये प्रक्षेपित केलेल्या न्यू होरायझन्स या यानाने पाठवले असून हे छायाचित्र प्लुटोपासून सुमारे २० कोटी ३० लाख किलोमीटर अंतरावरुन घेण्याच आल्याचे नासाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

हे छायाचित्र न्यू होरायझन्सच्या लाँग रेंज रीकन्सेंन्सर इमेजर(लॉरी) या दुर्बिणीतून घेण्यात आले आहे. पुढील काही महिन्यात लॉरी प्लुटोचे शंभर छायाचित्रे काढणार आहे. आतापर्यंत केवळ एखाद्या बिंदूप्रमाणे दिसत असलेला प्लुटोचा अभ्यास या छायाचित्रांच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने करता येणार आहे.

Leave a Comment