क्रेडिट कार्ड नंबरशिवाय नवा पत्ता शोधणे शक्य

credit-card
वॉशिंग्टन : एमआयटी विद्यापीठाच्या संशोधकांनी अनेक क्रेडिट कार्डधारकांच्या डेटाचे विश्लेषण केले. यात त्या कार्डधारकाची ओळख केवळ खरेदी तारीख व खरेदी केलेल्या स्थळाच्या आधारेच पटविली जाऊ शकते. या दोन बाबींच्या आधारे ९० टक्के व्यक्तींची ओळख शोधता आली. तीन महिन्यांतील १.१ कोटी क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांच्या डेटाचे विश्लेषण या अध्ययनादरम्यान करण्यात आले. क्रेडिट कार्डने किती रकमेची खरेदी करण्यात आली याची ठोबळ पाहणी या मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केली. तारीख, खरेदी स्थळ व रक्कम या तीन आधारांवर व्यक्तीची ओळख अचूक शोधता येत असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.याचाच अर्थ तुम्ही खरेदी केलेल्या तीन बिलांच्या कॉपीज, एखादे छायाचित्र आणि तुमच्या फोनवरून काही ट्विट केले असल्यास करोडो लोकांच्या डेटामधून तुमच्या क्र्रेडिट कार्ड डेटाची माहिती काढणे सहज शक्य आहे.

Leave a Comment