आता चष्म्याशिवाय पहा थ्रीडी चित्रपट

3d
आपल्याला थ्री डी चष्मा थ्री डी चित्रपट पाहण्यासाठी आवश्यक असतो. चष्म्याशिवाय थ्री डी चित्रपटांचा खराखुरा आनंद, अनुभव घेता येत नाही. मात्र आता थ्री डी चष्म्यांशिवायही थ्री डी चित्रपटांचा आनंद घेता येईल. ऑस्ट्रीयामधील वैज्ञानिकांनी थ्री डी चष्म्याशिवाय थ्री डी इफेक्टस्चा अनुभव घेता येईल असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान हळूहळू संपूर्ण जगभर उपलब्ध होऊ शकेल. या तंत्रज्ञानत वापरण्यात आलेल्या डिव्हाईसमधून बाहेर पडणारे लेझर बिम्स आपल्याला चष्म्याविना थ्री डी सिनेमाचा आनंद लुटता येऊ शकतो. व्हिएन्ना विद्यापीठातील संशोधकांनी हा शोध लावलेला आहे.

या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण घराबाहेर आणि दिवसाच्या प्रकाशातही थ्री डी इफेक्टच्या प्रतिमा पाहू शकतो असा दावा संशोधकांनी केला आहे. ट्रायलाईट टेक्नॉलॉजी या कंपनीने या तंत्रज्ञानाच्या आधारे प्रोटोटाईप तयार केला आहे. या कंपनीकडून आणखी एक प्रोटोटाईप तयार करण्यात येत आहे. या प्रोटोटाईपमध्ये हाय रिझ्योल्युशनच्या रंगीत प्रतिमा पहाता येतील. थ्री डी चित्रपटांमध्ये फक्त दोन रंगांचा वापर केला जातो. या दोन रंगांकडे आपले डोळे वेगवेगळ्या पद्धतीने पाहतात आणि मग एक दृश्य तयार होते.

व्हिएन्ना विद्यापीठातील संशोधकांनी लावलेल्या शोधामुळे आपल्या डोळ्यासमोर सर्व दृश्ये त्रिमिती प्रभावानुसार दिसतील. सध्या थ्री डी तंत्रज्ञानातील चित्रपट बनवण्यासाठी अनेक कॅमे-यांचा वापर केला जातो आणि नंतर हा चित्रपट थ्री डी फॉर्मेटमध्ये बदलला जातो. ट्रियलाईट टेक्नॉलॉजीचे नवे प्रोटोटाईप तयार करण्याचे काम जून २०१५ पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. थ्री डी चष्म्याशिवाय थ्री डी चित्रपट बघण्याचे तंत्रज्ञान पुढच्या वर्षी म्हणजे २०१६ मध्ये प्रत्यक्षात येईल असे या कंपनीकडून सांगण्यात आले.

Leave a Comment