हिंदूवादी संघटनाही साजरा करणार व्हेलेंटाईन डे?

valen
आजपर्यंत व्हलेंटाईन डेला विरोध करणारी हिंदुत्व ब्रिगेड यंदाचा व्हेलेंटाईन डे मात्र संस्मरणीय करण्याच्या प्रयत्नात आहे. हिंदू सभेने यावर्षी व्हेलेंटाईन डे साजरा करण्याची नवीन कल्पना राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार यंदा १४ फेब्रुवारीला वेगवेगळ्या धर्मातील पण एकमेकांशी विवाह करू इच्छीणार्‍या प्रेमी युगलांना एकमेकांशी विवाह करण्यास प्रोत्साहन दिले जाणार असून असे विवाह करणार्‍यांचे स्वागत केले जाणार आहे. मात्र यात हिंदू मुलाशी अन्य धर्मिय मुलगी विवाह करणार असेल तर तिला विवाहापूर्वीहिंहिदू धर्माचा स्वीकार करावा लागणार आहे. ख्रिश्चन अथवा मुस्लीम मुलींना हिंदू मुलाशी विवाह करायचा असेल तर विवाहाच्या आदल्यादिवशी त्यांना हिंदू करून घेतले जाणार आहे असेहिंहिदू सभा राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक यांनी सांगितले.

वेगळे धर्म पाळणार्‍या प्रेमी जनांसाठी ही प्रेम परिक्षाच असल्याचे चंद्रप्रकाश यांचे म्हणणे असून त्यासाठी सभेने ६ पथके तयार केली आहेत. ही पथके दिल्ली आणि उत्तरप्रदेशात फिरून अशा विवाहोत्सुक युगलांचा शोध घेतील आणि त्यांना विवाहासाठी प्रोत्साहन देतील असे समजते.

Leave a Comment