
मुंबई : जगभरात आपला ठसा आणखी एका भारतीय कंपनीने उमटवला असून नुकतेच हार्ली डेव्हिडसनला दमदार बाईक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रॉयल एनफिल्ड’ने धोबी पछाड दिली आहे.
महागड्या ‘हार्ली डेव्हिडसन’ला ‘रॉयल एनफिल्ड’ची धोबी पछाड
आपल्या तब्बल ३ लाखांहून जास्त बाईकसची विक्री २०१४ या वर्षात रॉयल एनफिल्डने केली आहे तर विक्रीच्या बाबतीत महागडी हार्ली डेव्हिडसन मागे पडली आहे. हार्ली डेव्हिडसन केवळ २.६७ लाख बाईकची विक्री केली आहे.
भारतामध्ये स्वस्तात स्वस्त हार्लीची बाईक ५ लाख रुपयांना उपलब्ध आहे. तिथे रॉयल एनफिल्ड ५३५ सीसीपर्यंतच बाईक बनवतात. भारतामध्ये रॉयल एनफिल्डची किंमत २ लाखांपर्यंत आहे.
रॉयल एनफिल्डची अवस्था २००४-०५ पर्यंत बिकट होती. परंतु, क्लासिक, न्यू थंडरबर्ड आणि कॉन्टिनेन्टल जीटीसारखे नवनवीन मॉडल्स आणून रॉयल एनफिल्डने आपले वर्चस्व बाजारावर प्रस्थापित केले आहे.
