‘गूगल’ देणार चिथावणीखोरांची माहिती

google
देहरादून : आता ‘गूगल’ ‘व्हॉटसअप’वरून धार्मिक भावना भडकावण्यासाठी मॅसेज धाडणाऱ्याबद्दल माहिती देणार आहे. एका प्रकरणात कोतवाली पोलिसांनी कॅलिफोर्निया स्थित गूगल कंपनीकडून डाटा मागविला आहे.

व्हॉटसअपवरून नुकताचव्हायरल झालेल्या एका फोटोतून धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न झाला होता. हिंदू संघटनांनी याविरोधात कोतवालीमध्ये जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा मोबाईल जप्त करून चौकशी सुरू केली. यामध्ये पोलिसांना, धार्मिक भावना भडकावणारे काही मॅसेजेस तसेच काही अश्लील फोटोही सापडले आहेत. या आरोपींना नोटीस देऊन त्यांना सोडून दिले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटसअपवरून हा फोटो कोणत्या मोबाईलवरून पाठवण्यात आला होता याची माहिती गूगल देणार आहे. त्यानंतर या प्रकरणात दोषींविरुद्ध आरोप दाखल केले जातील. उल्लेखनीय म्हणजे, याच वादग्रस्त फोटोवर काशीपूर आणि पिथोरागड तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Comment