आयबॉलचा नवा अँडी ५ क्यू कोबाल्ट

cobalt
भारतीय इलेक्ट्रोनिक उत्पादक कंपनी आयबॉलने त्यांचा अनेक नवीन फिचर्स असलेल्या आयबॉल अँडी फाईव्ह क्यू कोबाल्ट सोलस स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला असून सध्या तो ईबे वर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन पूर्वीच्या स्मार्टफोनपेक्षा वजनाला हलका आणि स्लीमही आहे.

या नवीन स्मार्टफोनसाठी ५ इंचाचा डिस्प्ले, २ जीबी रॅम, ड्युअल सिम, अँड्राईड किटकॅट ४.४, १६ जीबी इंटरनल मेमरी, ३२ जीबीपर्यंत कार्डच्या सहाय्याने वाढविण्याची सुविधा, ओजीएस टच पॅनल, ग्लास फिनिश बॅक पॅनल,१३ एमपी ऑटो फोकस मेन कॅमेरा, एलईडी फ्लॅश, ५ एमपी फ्रंट कॅमेरा, लाईव्ह फोटो ऑप्शन, फेसब्युटी, पॅनोरमा मोड, फेस डिटेक्शन, स्माईल शॉट सपोर्ट करणारी सुविधा, थ्र्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ कनेक्टिव्हीटी, जीपीएस, तसेच प्रॉग्झिमिटी, लाईट, गॅग्नेट, जी सेन्सर, शेक टू आन्सर, स्मार्ट डायल, फ्लिप टू म्यूट सुविधाही दिली गेली आहे. फोनची किंमत आहे अवघी ११९९९ रूपये.

Leave a Comment