स्वाईन फ्लूची माजी मुख्यमंत्री गेहलोत यांना लागण

gehlot
जयपूर : राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही स्वाईन फ्लू आजाराची लागण झाली असून गेहलोत यांनी स्वत:च सोशल मीडियातून त्यांच्या आजाराची माहिती दिली. वेळीच उपचार सुरू झाल्याने आता प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या संसर्गाबद्दल गेहलोत यांनी राजस्थान सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे. सरकारकडून आजाराबद्दल कसलीही जनजागृती करण्यात आलेली नाही. पुरेशा माहितीच्या अभावी लोकांना जीव गमवावा लागत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात पहिला रुग्ण आढळला, तेव्हाच आम्ही मोफत आरोग्य तपासणी सुरू केली होती, असे त्यांनी सांगितले. राजस्थानातील २२ जिल्ह्यांत सध्या स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. राजधानी जयपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून एकट्या जयपूरमध्ये ११ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment