हाईकच्या मागोमाग व्हॉटस् अॅपची फ्री व्हाईस कॉलिंग सेवा

whatsaap
नवी दिल्ली : व्हॉटस अॅपनेही हाईकअॅपच्या पावलावर पाऊल टाकत फ्री व्हाईस कॉलिंगची सुविधा भारतीय ग्राहकांना दिली आहे. सध्या फक्त चाचणीच्या पातळीवर सुरू असलेली ही सुविधा लवकरच सर्वच व्हॉटस अप सबस्क्राईबर्सना मिळणार आहे. व्हॉटस अॅपने अजून याबाबत काही अधिकृत माहिती प्रसारित केली नसली तरी काही मर्यादित ग्राहकांना व्हाईस कॉलिंगची सुविधा चाचणीसाठी उपलब्ध करून दिली आहे. व्हॉटस अॅपच्या अगोदर हाईकने फ्री व्हाईस कॉलिंगची सुरुवात केली असली तरी व्हॉटस अॅपचा यूजर बेस हा खूप जास्त आहे. त्यामुळे व्हॉटस अॅपने उशिरा सुरुवात केली असली तरी फारसा फरक पडणार नाही. असे जाणकारांना वाटते. सध्या चाचणीच्या पातळीवर असलेली व्हॉटस अॅपची फ्री व्हाईस कॉलिंग सेवा ही फक्त निमंत्रितांसाठीच आहे. म्हणजे सध्या ज्या कुणाला ही फ्री व्हाईस कॉलिंगची सेवा उपलब्ध झाली आहे, त्यांच्याकडून तुम्हाला व्हॉटस अॅप कॉल येणे आवश्यक आहे. तसेच सध्या फक्त अँड्राईड स्मार्टफोनधारकांसाठीच ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयफोनच्या आयओएसवर फ्री व्हाईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध होण्यासाठी आणखी काही प्रतीक्षा करावी लागणार आहे. व्हॉटस अॅपच्या २.११.५०८ या लेटेस्ट अपडेटमध्ये उपलब्ध आहे. तसंच हे लेटेस्ट अपडेट गूगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले नाही तर त्यासाठी तुम्हाला व्हॉटस अॅपच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अझ्ख् फाईल डाऊन लोड करावी लागेल.

Leave a Comment