शेतकऱ्यांसाठी ‘किसान’ वाहिनी एप्रिलपासून

kisan
नवी दिल्ली – आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था अजूनही शेतीवर अवलंबून आहे. शेती व शेतक-यांना वाहिलेली खास ‘किसान’ ही वाहिनी एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. ही वाहिनी २४ तास चालणार आहे.

‘डीडी किसान’ वाहिनीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली यांनी घेतली. या बैठकीला माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड, सचिव बिमल झुल्का, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सिरकार व डीडीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही वाहिनी एप्रिलच्या मध्यापासून सुरू होणार आहे. विशेषत: बैसाखीच्या पार्श्वभूमीवर या वाहिनीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

सरकार व प्रसारभारती या वाहिनींच्या कार्यक्रम निर्मितीवर अखेरचा हात फिरवत आहेत. या वाहिनीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात केली आहे. या वाहिनीद्वारे शेती व कृषीविषयक सर्व माहिती रिअल टाईम तत्त्वावर दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment