जपानचा स्पाय सॅटेलाईट लाँच

japan
जपानने गुप्त माहिती गोळा करण्यासाठी रविवारी स्पाय सॅटेलाईट लाँच केला आहे. या वर्षात जपानकडून लाँच केला गेलेला हा पहिला उपग्रह आहे. या उपग्रहात असे रडार बसविले गेले आहे की जे ढग, वादळे, पाऊस, अंधार अथवा कोणत्याही वातावरणाला भेदून पृथ्वीवरचे हाय रेझोल्युशन फोटो काढू शकणार आहे.

१९९८ साली शेजारी राष्ट्र उत्तर कोरियाने जपान आणि पश्चिम पॅसिफिक भागात मध्यम क्षमतेची बॅलेस्टीक क्षेपणास्त्रे डागली होती. त्यानंतर २००० पासून जपानने स्पाय उपग्रह लाँच करण्याची सुरवात केली. जपान एरोस्पेस एक्स्प्लोरर एजन्सी व मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीीज लिमिटेड यांनी संयुक्त सहकार्याने हा उपग्रह कागोशिमा प्रांतातून अवकाशात पाठविला. प्रथम २९ जानेवारीलाच हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार होता मात्र खराब हवामानामुळे तो रविवारी सोडला गेला. राष्ट्रीय सुरक्षा व संकटकालीन सूचना वेळेवर मिळाव्यात म्हणून जपानने यापूर्वीही असे दोन उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. दोन प्रोटोटाईल ऑप्टीकल उपग्रहांसह जपानने अवकाशात सोडलेल्या उपग्रहांची संख्या आता १३ झाली असून त्यातील सहा उपग्रह रडारसह आहेत.

Leave a Comment