जगातला सर्वात चिमुकला कॉम्प्युटर चेस

boot-chess
बुद्धीबळाचा खेळ संगणकावर खेळण्याची मजा कदाचित वेगळीच असू शकते. संगणक प्रोग्रामिंगमध्ये जसे गतीला महत्त्व आहे तसेच महत्व आकारालाही आहे. फ्रान्समधील एका कॉम्प्युटर कोडरने जगातील सर्वात लहान संगणक चेस डिझाईन केला आहे. बूट चेस असे त्याचे नामकरण केले गेले असून या चेसचा आकार फक्त ४८७ बाईट इतका आहे. विशेष म्हणजे तो सोर्स कोडला विंडोज, मॅक ओएस, लायनेक्स वरही चालू शकतो.

यापूवीचा सर्वात छोटा संगणक चेस शतरंज एलके- झेड के हा होता आणि गेली ३३ वर्षे त्याचा विक्रम कायम होता. त्याचा आकार होता ६७२ बाईटस. नव्या बूट चेसमध्ये कांही त्रुटी जरूर आहेत म्हणजे त्यात कासलिंगसारखा डाव खेळता येत नाही. तसेच प्यादे वझीर वगैरे मोहर्‍यांसाठी आकाराऐवजी अक्षरे दिली गेली आहेत. तरीही इतका छोटा चेस प्रोग्रॅम बनविणे हे अद्भूत काम असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment