मस्त गाजर बर्फी

gajar
साहित्य- गाजर अर्धा किलो, खवा पाव किलो, साखर १ वाटी, काजूपूड अर्धी वाटी, साजूक तूप दोन चमचे, दूध १ कप, वेलदोडा पावडर, सजावटीसाठी पिस्ते, काजूचे तुकडे, बदाम आवडीप्रमाणे
कृती- प्रथम गाजरे स्वच्छ धुवून किसून घ्या. एका पातेल्यात दूध उकळवा, उकळी आल्यावर गाजराचा किस घाला. चांगले ढवळा. दध आटत आले की साजूक तूप घालून पुन्हा हलवा. मिश्रण घट्ट होत आले की साखर घालून पुन्हा ढवळत रहा. गाजराचा रस आटत आला की खवा घाला. मिश्रण थोडे सैल होईल ते पुन्हा घट्ट होईपर्यंत ढवळा. कोरडे होऊ लागले की काजू पावडर घाला. वेलदोडा पूड, काजूचे तुकडे घालून हलवा. मिश्रण पातेल्याच्या कडेने सुटू लागले की ट्रेला तुपाचा हात लावून त्यावर मिश्रण घाला आणि थापा. गार झाल्यावर वड्या कापा, वरून पिस्ता, बदाम घालून सजवा.

या वड्या आठ दिवसांपर्यंत चांगल्या राहतात. फ्रिजमध्ये ठेवल्यास आणखी टिकतात.