स्वदेशी बनावटीच्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

missile
बालासोर : आज सकाळी ओडिशाच्या किनारपट्टीवरील व्हीलर्स आयलंड येथे संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी-५ या आंतरखंडीय अण्वस्त्रवाहू क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र ५००० किलोमीटरचा पल्ला गाठून लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते.

सकाळी ८.०६ वाजता अग्नी-५ चे प्रक्षेपण एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या (आयटीआर) प्रक्षेपक तळ क्रमांक चार येथून दूरप्रक्षेपकाच्या साह्याने करण्यात आले, अशी माहिती आयटीआरचे संचालक एमव्हीकेव्ही प्रसाद यांनी दिली.
विविध रडार आणि नेटर्वक सिस्टीम्सवरून संपूर्ण तपशील मिळाल्यानंतर सविस्तर परिणाम समजतील, असे त्यांनी सांगितले. भारताची मोठी कामगिरी आहे.

Leave a Comment