‘नॅनो’ टाकणार कात

nano
नवी दिल्ली : आता नव्या रुपात टाटा मोटर्सची सर्वसामान्यांना परवडणारी ‘नॅनो’ येणार असून नॅनोची विक्री वाढवण्यासाठी टाटा मोटर्स ‘नॅनो’मध्ये अनेक बदल करण्याचे प्रयत्न करत आहे. नव्या रुपात येणाऱ्या नॅनोमध्ये ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या विविध सुविधा असणार आहेत. या नव्या रुपातील नॅनो कारचा एक लूक ‘ऑटो एक्स्पो-२०१४’मध्ये दाखवण्यात आला होता. गर्दीच्या ठिकाणी नॅनो कार चालवणे सोपे जावे, यासाठी टाटा मोटर्सने हे पाऊल उचलले आहे. महिला कार चालकांच्या दृष्टीनेही नव्या स्वरुपातील नॅनोत बदल केले आहेत.

टाटा मोटर्सची ‘नॅनो’ मोठ्या आशेसह २००९ मध्ये बाजारात उतरवली होती. मात्र नॅनोच्या विक्रीला अपेक्षित प्रतिसाद मिळाल नव्हता. गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर २०१४ पर्यंत केवळ ११ हजार ३३३ नॅनो कार्सची विक्री झाल्यामुळे टाटा मोटर्स नॅनो कारचे उत्पादन बंद करणार असल्याच्या अफवा पसरत होत्या. मात्र टाटा मोटोर्सने या अफवांचे खंडन केले आहे.

टाटा मोटोर्स नॅनो कार ग्राहकांसमोर नव्या रुपात घेऊन येणार आहे. शिवाय अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर केला जाणार आहे. ग्राहकांच्या पसंतीस पडेल, यादृष्टीने प्रयत्न असल्याचे टाटा मोटोर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Leave a Comment