आता सही-शिक्क्यासह मिळणार ‘सात-बारा’चे ऑनलाईन उतारे!

eknath-khadse
पुणे: शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला असून यानिर्णयानुसार शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला ‘सात बारा’चे ऑनलाईन उतारे आता सही शिक्क्यासहीत मिळणार आहेत. आजपासून ही सुविधा सुरु होणार असल्याची घोषणा कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी एका पुरस्कार वितरण कार्यक्रमादरम्यान केली.

सध्या सात-बारा उतारा ऑनलाईन जरी मिळत असला तरी मात्र त्यावर सही आणि शिक्का घेण्यासाठी पुन्हा तलाठ्याकडे जावे लागते. मात्र या नव्या प्रक्रियामुळे आता शेतकऱ्यांना सात-बाराच्या उताऱ्यासाठी तलाठ्यांचे उंबरे झिजवण्याची गरज पडणार नाही. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांना आपला उतारा तलाठ्यांच्या सही शिक्क्यानिशी मिळेल.दरम्यान, गुढीपाडव्यापर्यंत दूरदर्शनचं किसान चॅनल सुरू होईल अशी माहिती केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.