स्पेसशीप सारखे भासतेय अॅपलचे नवे कार्यालय

apple
कॅलिफोनिया – गेल्या तीन महिन्यात आयफोन ६ व प्लसच्या विक्रीतून विक्रमी नफा कमावलेल्या व जगातील सर्वाधिक व्हॅल्यूएबल कंपनीचा किताब मिळविलेल्या अॅपलचे क्युपर्टिनो, कॅलिफोनिर्यातील नवे कार्यालय पूर्णत्वाच्या मार्गावर असून हे कार्यालय एखाद्या स्पेसशीपप्रमाणे भासते आहे. या कार्यालयात थेट ऑडिटोरियमपर्यंत जाणारा अंडरग्राऊंड रस्ता खासच असल्याचेही सांगितले जात आहे.

हे कार्यालय असे डिझाईन केले गेले आहे की जोराच्या भूकंपाचाही त्याच्यावर कांहीही परिणाम होणार नाही. या कार्यालयाच्या आवारात रूग्णालय, फायर हाऊस, पोलिस स्टेशनसह सर्व सुविधा असून हे कार्यालय जमिनीखाली ४०० फूट खोलात आहे. ग्लास, स्टील मार्बलचा वापर करून ही इमारत बांधली गेली आहे आणि येथे फार्मही आहे. या फार्ममधून आवश्यक अन्न पिकविले जाणार आहे. आवारात सफरचंदे, प्लम, चेरी, अक्रोड, आर्लव्ह यांची अनेक झाडे लावली गेली आहेत.

ऑडिटोरियमचे डिझाईन असे केले गेले आहे की येथील अधिकारी प्रेसला न भेटताही आरामात हिंडू शकतात. कंपनीने गेल्या तीन महिन्यात १.१ लाख कोटी म्हणजे १८ अब्ज डॉलर्सचा निव्वळ नफा कमावला आहे. या काळात कंपनीने आयफोनची ७ कोटी ४५ लाख युनिट विकली आहेत. याचाच अर्थ दर तासाला कंपनीने ३४००० फोन्सची विक्री केली आहे.

Leave a Comment