‘हाईक’तर्फे मोफत फोनची सुविधा

hike
नवी दिल्ली- मोफत फोनची सुविधा ‘हाईक’ मेसेंजरतर्फे चॅटिंग अॅप्लिकेशनतर्फे त्यांच्या ग्राहकांना देण्यात आली असून जगातील २०० देशांमध्ये टू जी, थ्री जी आणि वायफाय सेवा ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.

नुकतीच ‘झिप’ फोन ही कंपनी हाईक कंपनीने विकत घेतल्यानंतर अवघ्या महिन्यात मोफत फोन देण्याची सुविधा ग्राहकांना दिली आहे. ही सेवा अॅँड्राईडवरील बेटा तंत्रज्ञानावर पुरवण्यात येणार आहे. मात्र, अॅपल आणि विंडोजवर आधारित सेवा नंतर सुरू करण्यात येईल, असे कंपनीने सांगितले.

हाईक, व्हॉट्सअॅप, लाईन, स्काइप या कंपन्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी मोबाईल कंपन्यांकडून केली जात आहे. इंटरनेटवरून फोनची सुविधा देण्यासाठी दूरसंपर्क नियंत्रण प्राधिकरणाने संबंधित कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे.

भारती इंटरप्राइजेस आणि सॉफ्टबॅँक कॉर्पोरेशनतर्फे ‘हाईक’ ही मेसेंजर सेवा सुरू केली आहे. भारती इंटरप्राइजेसचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांचे पुत्र कविन भारती मित्तल यांनी ही कंपनी स्थापन केली आहे. भारत हा किमतीबाबत अतिशय संवेदनशील देश आहे. तसेच ही सेवा अधिक कार्यक्षम केली आहे. ही सेवा आम्ही जगातील २००हून अधिक देशांमध्ये सुरू केली आहे, असे कविन मित्तल यांनी सांगितले.

Leave a Comment