स्पाईसजेटने १५०० रूपयांत देशभराची सफर

spice
दिल्ली – गेले कांही महिने आर्थिक संकटात सापडलेल्या स्पाईसजेटने त्यांच्या स्वस्तातील तिकीटांची विक्री बुधवारपासून सुरू केली असून या योजनेनुसार ग्राहक १४९९ रूपयांच्या तिकीटात देशातील कोणत्याही रूटवर प्रवास करू शकणार आहेत. शुक्रवारपर्यंत या तिकीटांची विक्री सरू राहणार आहे. अशी सवलतीतील ५ लाख तिकीटे कंपनी विकणार आहे. १५ फेब्रुवारी ते ३० जून या काळासाठी ही तिकीटे खरेदी करता येणार आहेत.

स्पाईसजेट पाठोपाठ अन्य विमान कंपन्याही अशी सवलीतीतील तिकीटे उपलब्ध करून देतील असा तज्ञांचा अंदाज आहे. स्पाईसजेटच्या घोषणेनुसार प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या न्यायाने ही तिकीटविक्री केली जात आहे. स्पाईसजेट पुन्हा एकदा नफ्यातील व्यवसायासाठी प्रयत्नशील आहे. फेब्रुवारी ते जून हा गर्दी कमी असलेला सिझन असतो त्यामुळे या सीझनसाठी सवलती देऊन मिळालेल्या अॅडव्हान्समधून कंपनी आपली कर्जे भागविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले जात आहे. कंपनीला डीजीसीएने आक्टोबर पर्यंत बुकींग करण्याची परवानगी दिली आहे. मात्र जूननंतर पुन्हा सीझन सुरू होत असल्याने त्यावेळी तिकीटांचे दर वाढलेले असतात म्हणून जूनपर्यंतच ही सवलतीची योजना कंपनीने जाहीर केली आहे.

सवलतीतील ही तिकीटे रद्द करता येणार नाहीत अथवा त्यावरची नांवेही बदलता येणार नाहीत असेही कंपनीने जाहीर केले आहे.

Leave a Comment