सौदीत मिशेल ओबामांचे फोटो झाले सेन्सॉर

michell
रियाध – भारताच्या तीन दिवसांच्या भेटीनंतर सौदीला पोहोचलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत असलेल्या फर्स्टलेडी मिशेल सौदीतील त्यांच्या स्वागताने नाराज झाल्या आहेत. एकीकडे मिशेल नाराज असतानाच सौदीतही मिशेल यांचा पोशाख आणि त्यांनी स्कार्फ न बांधता उघडे ठेवलेले मस्तक यामुळे सोशल मिडीयावर टीकेचा पाऊस पडला आहे.

सौदीचे राजे अब्दुल्ला यांच्या निधनानंतर सांत्वनासाठी ओबामा सौदीला गेले होते. मात्र विमानतळावर राजे सुलतान आणि त्यांचे अधिकारी यांनी स्वागतावेळी फत्त* ओबामा यांच्याशी हस्तांदोलन केले. मिशेल यांच्याकडे पाहून केवळ स्मित केले गेले तेव्हाच मिशेल नाराज झाल्या सहोत्या. मात्र सौदीत परस्त्रियांना स्पर्श करण्याची पद्धत नसल्याने मिशेल यांच्याशी हस्तांदोलन केले गेले नाही असा खुलासा करण्यात आला.

मिशेल यांनी सौदीत उतरताना स्लॅक आणि टॉप असा पूर्ण पोशाख केला होता मात्र त्यांनी डोक्यावर स्कार्फ बांधला नव्हता. सौदीत महिलांना डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकून घ्यावे लागते. परदेशी महिलांसाठी हा नियम नाही मात्र तरीही सौदी दूरदर्शनने ओबामा आणि राजे सुलतान यांच्या भेटीची दृष्ये दाखविताना मिशेल यांची छबी धूसर केली म्हणजेच एका अर्थाने मिशेल यांना सेन्सॉर केले गेले. कारण सोशल मिडीयावर मिशेल यांनी स्कार्फ न घातल्याबद्दल तसेच शोक समारंभासाठी येताना चमकदार निळे जाकीट घातल्याबद्दल अगोदरच टीकेचा पाऊस पडला होता. सौदी दूरदर्शन वाहिनीने मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment