किंग खानने ट्वीटरवर केला पहिला व्हिडीओ शेअर

shahrukh
मुंबई – बॉलिवूड अभिनेता किंगखान शाहरूखने ट्वीटरने व्हिडिओ ट्वीट सुरू केल्यानंतर सर्वात पहिला व्हिडिओ ट्वीट केला असून शाहरूख खान हा ट्वीटरवरून व्हिडिओ शेअर करणारा पहिला भारतीय असल्याचा निर्वाळा ट्वीटर इंडियानेही आपल्या ट्वीटमध्ये दिला आहे.

यूट्यूब किंवा अन्य सोशल नेटवर्किंगवरील व्हिडिओच्या लिंक ट्वीटरवरून शेअर करता येत होत्या. मात्र ट्वीटरच्या मोबाईल अॅपमध्ये ताज्या अपडेटमध्ये ट्वीटर कॅमेऱ्याच्या माध्यमातून थेट व्हिडिओ शूट करून शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ट्वीटरच्या डायरेक्ट मेसेजमध्ये आता व़्हॉट्सअपप्रमाणे आता ग्रुप चॅट करता येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण ट्वीटरवर बनवलेल्या एखाद्या ग्रुपमधील चॅट हे पूर्णपणे प्रायव्हेट राहील, याची काळजीही ट्वीटरने घेतली आहे.

ट्वीटरवर व्हिडिओ शूट करून शेअरिंग करण्याचा पर्याय येण्यापूर्वी स्टील फोटो शूट करून शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आता त्यात ३० सेकंदापर्यंतच्या व्हिडिओची भर पडली आहे.

Leave a Comment