जगातील सर्वात मोठे हॉटेल ७० वर्षापासून पडले धूळखात!

hotel
टोकियो : एका सुंदर आयलँडवर जगातील सगळ्यात मोठे हॉटेल, सुमारे १० हजार खोल्या असलेले हे हॉटेल डौलात उभे असून परंतु त्यामागची सत्यता वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, मागील ७ दशकांपासून हे हॉटेल भग्नावस्थेत पडले असून या हॉटेलकडे व्यक्ती फिरकायला तयार नाही.

जगातील हे भव्य हॉटेल कोणाचे? हॉटेलची निर्मिती कोणी केली? एवढेच नाही तर हे इतके भव्य हॉटेल भग्नावस्थेत का पडलंय? असे अनेक प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडले असतील.जगातील सगळ्यात मोठे हॉटेल ‘दा प्रोरा’ जर्मनीच्या बाल्टिक महासागरावरील रुगेन आयलँडवर आहे. या सी-फेसिंग हॉटेलमध्ये दहा हजार बेडरुम्स आहेत. सुमारे ७० वर्षांपूर्वी हे हॉटेल बांधण्यात आले होते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा पासून एकही यात्रेकरू या हॉटेलमध्ये उतरला नाही.जर्मनीतील नाझी शासन काळात भव्य हॉटेल ‘दा प्रोरा’ ची निर्मिती १९३६ ते १९३९ दरम्यान करण्यात आली होती. हॉटेलच्या बांधकामासाठी नऊ हजार कामगार लागले होते.

जर्मनीतील वर्कसचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने नाझींनी या हॉटेलची निर्मिती केली होती. मात्र या हॉटेलचे स्ट्रक्चर पाहून स्थानिक लोक याला प्रोरा असे संबोधतात. (‘प्रोरा’ या शब्दाचा अर्थ ‘बंजर भूमी’ ) हॉटेल प्रोरामध्ये एक समान आठ बिल्डिंग आहेत. आठही बिल्डिंग्ज समुद्र किना-यापासून १५० मीटर अंतरावर आहे. नाझींनी मोठे नियोजन केले होते. याच चार एकसारखे रिसार्ट होते. सिनेमा, फेस्टिवल हॉल, स्विमिंग पूल होते. विशेष म्हणजे येथे एक क्रूजशिपही उभे केले जाणार होते. जर्मनीचा हुकुमशाह एडोल्फ हिटलरचे नियोजन खूप महत्त्वाकांक्षी होते. हिटलरला जगातील सगळ्यात मोठे एक गोलाकार रिसॉर्ट बनवायचे होते. त्यात २० हजार पेक्षाही जास्त बेडरुम्स असावेत, असे हिटलरला वाटायचे. हॉटेलच्या प्रत्येक बेडरुम्समधून समुद्राचे विलोभनिय नजरा दिसावा, अशा पद्धतीने या हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे.

‘दा प्रोरा’ मधील प्रत्येक बेडरुम ५ बाय २.५ मीटरचे आहेत. दोन बेड, एक कपाट, टेबल खुच्र्या आहेत. प्रत्येक फ्लोअरवर टॉयलेट, शॉवर आणि बॉलरुम सामुहीक बनवण्यात आले आहेत. युद्धकाळात या हॉटेलचे रुपांतर रुग्णालयात करण्यात येईल, असेही नियोजन करण्यात आले होते. हिटलरचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट पूर्ण होण्यापूर्वीच दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. त्यामुळे हॉटेलचे बांधकाम करणा-या कामगारांना पीनेमंडे येथील शस्त्र निर्मिती कारखान्यात पाठवण्यात आले होते. दुस-या महायुद्धात मित्र देशांनीच बॉम्ब हल्ले केल्याने हमबर्ग येथून स्थलांतरीत झालेल्या लोकांनी याच हॉटेलचा आश्रय घेतला होता. दुस-या महायुद्ध समाप्त झाल्यानंतर दा प्रोराचे काम रखडले नाझींनी याचा वापर एक मिलिट्ररी पोस्ट म्हणूनही केला. १९९० मध्ये पश्चिम आणि पूर्व जर्मनी एकत्र झाल्यानंतर या हॉटेलचा वापर एक मिलिट्ररी टेक्नीकल स्कूल म्हणूनही करण्यात आला होता.

Leave a Comment