अमेरिकेतील गटारात सापडले घबाड

gold
न्यूयॉर्क – आपल्या देशात एके काळी सोन्याचा धूर निघत असे, हे वाक्य सर्वांनीच ऐकलेले असेल. त्यातून आपल्या समृद्धतेची महती आणि संपन्नतेची साक्ष पटते. कितीही संपन्न देश असला तरी कधी कोणी सोने गटारात टाकून देणार नाही, हे नक्की! पण अलीकडेच झालेल्या एका संशोधनानुसार, अमेरिकेत कोट्यवधी रुपये किमतीचे सोने चक्क गटारात टाकले जात आहे.

अमेरिकेतील ऍरिझोना विद्यापीठातील संशोधकांच्या एका गटाने काही दिवसांपूर्वीच, अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये गटारातील घाणीत आणि कचर्यायत वाया जाणार्याा किंवा टाकून दिल्या जाणार्याि धातूंचा अभ्यास केला. हा अभ्यास करण्यासाठी त्यांनी फक्त ‘मास स्पेक्टोमीटर’ या यंत्रणेचा वापर केला. त्यांच्या या अभ्यासात, अमेरिकेतील गटारातील घाणीत जवळपास सव्वा कोटी डॉलर्स किमतीचे धातू मिळाले. अमेरिकेच्या रूढ परिमाणात १३ दशलक्ष डॉलर्स एवढे त्याचे मूल्य आहे. त्यातील सोन्या-चांदीसारख्या मूल्यवान धातूचे प्रमाण जवळपास २५ लाख डॉलर्सच्या घरात जात असल्याचा निष्कर्ष या संशोधकांनी मांडला आहे.

Leave a Comment