टाटा मोटर्सच्या अखत्यारीत असलेल्या जग्वारच्या लँड रोव्हरसाठी नवीन बाईक सेन्सरवर काम सुरू करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हे सेन्सर चालकाला अपघात होण्यापूर्वीच अपघाताची शक्यता असलेल्या ठिकाणी सूचना देऊ शकणार आहेत. यामुळे वाहन चालकाबरोबरच पादचारी, सायकलस्वार आणि बाईक चालकांनाही आपोआपच सुरक्षा मिळणार आहे.
जग्वार लँड रोव्हरसाठी नवीन बाईक सेन्सर
कंपनीचे संचालक वोल्फगोंग अॅपल या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की प्रकाश आणि आवाजाच्या मदतीने हे सेन्सर कार चालकाला अॅलर्ट देऊ शकणार आहेत. चालक वाहन चालविताना जे धोके पाहू शकत नाही त्याचीही सूचना या सेन्सरमुळे मिळू शकणार आहे. उदाहरणार्थ एखादा पादचारी अथवा सायकलस्वार रस्ता ओलांडत असेल तर कारमधील सेन्सर चालकाचे लक्ष त्यांच्याकडे वेधतील मात्र तरीही चालकाने दुर्लक्ष केले आणि अॅक्सेलरेटर दाबला तरी गाडीचा वेग वाढणार नाहीच उलट गाडी पुढेच जाणार नाही यामुळे अशा अपघातांचा धोका उरणार नाही.