ओबामांचे राहणीमान एका राजाप्रमाणेच

obama
वॉशिंग्टन : अब्जावधी रुपये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांच्या नोकरचाकर व लवाजमावर खर्च केले जातात. ओबामांचे घर, सर्व सुविधांनी युक्त असे राहण्यासाठी दंतकथेतील परिकल्पनेप्रमाणे एअरफोर्स वन, जगातील सर्वात सुरक्षित असलेले कार आणि पाच अंकी डॉलरचा पगार असे सर्व काही महासत्तेच्या अध्यक्षांकडे आहे. एकंदरीत त्यांचे राहणीमान एका राजाप्रमाणेच आहे. मात्र सर्व राष्ट्राध्यक्षांना ओबामासारखी सुविधा नाही. याचे उदाहरण म्हणजे उरुग्वेचे अध्यक्ष जोस मुजीका होय. आपल्या देशात सर्वात लोकप्रिय असणा-या जोस यांची जीवनशैली खूप साधी आहे.