आता देशभरात वापरा फक्त एकच मोबाईल नंबर

mobile
नवी दिल्ली : एका राज्यातून दुस-या राज्यात गेल्यानंतर मोबाईल नंबर बदलावा लागत असल्याने त्रास होणा-यांसाठी आनंदाची बातमी. दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) येत्या ३ मेपासून संपूर्ण देशात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची (एमएनपी) सुरुवात करणार आहे. यामुळे मोबाईल ग्राहक देशातल्या कोणत्याही राज्यात गेल्यास मोबाईल नंबर न बदलता दूरसंचार सेवा देणारी कंपनी बदलू शकतात.
मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवा एप्रिल २०१४ पासून सुरु करण्यात आली होती. मात्र, ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी तंत्रज्ञान योग्यपणे वापरले नव्हते. टड्ढायने दूरसंचार कंपन्यांना ३ मे २०१५ पर्यंत देशभरात एमएनपी सेवा लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाईल ग्राहकांसाठी सध्या दूरसंचार कंपनींकडून एमएमपी सेवा मर्यादित आहे. म्हणजे ग्राहक संबंधित दूरसंचार सेवा देणा्या कंपन्यांच्या क्षेत्रातच त्या सेवेचा लाभ घेऊ शकतात. अनेकवेळा ही सेवा एका राज्यापुरती सिमित असते. दरम्यान, मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी करीत असताना पोस्ट पेड मोबाईलधारकांचाही विचार केला जाणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण आता येत्या ३ मेपासून ही योजना अंमलात आणणार आहे. शिवाय टड्ढायने ६ फेब्रुवारी २०१५ पर्यंत लोकांकडून सूचनाही मागवल्या आहेत. त्यामुळे लवकरच देशाच्या कोणत्याही राज्यातून मोबाईल नंबर न बदलता दूरसंचार सेवा देणारी कंपनी बदलता येणार आहे.

Leave a Comment