नवी दिल्ली: लवकरच एक असा स्मार्टफोन कमी किमतीचे मोबाईल उपकरण बनवणारी कंपनी डाटाविंड लॉन्च करणार असून ज्यात तब्बल एक वर्ष फ्रीमध्ये इंटरनेट उपलब्ध असेल.
डाटाविंड आणणार एका वर्षाच्या फ्री इंटरनेटसोबत स्मार्टफोन
कंपनीने यासाठी जवळपास १५० कोटी रूपयांचे बजेट ठरवले असून . या स्मार्टफोनची किंमत अवघी ३००० रुपये असेल. योजनेबाबत अधिक माहिती देतांना डाटाविंडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुजीत सिंह टुली म्हणाले, आम्ही काही खाजगी ऑपरेटर्ससोबत चर्चा करतो आहे. ज्यासोबत मिळून एक असा मोबाईल लॉन्च करू शकू ज्यात एक वर्ष फ्री इंटरनेट सुविधा असेल ज्याची किंमत ३००० रुपयांपर्यंत असेल. सध्या इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या ट्रेंड्सबद्दल बोललो तर जवळपास ७६ टक्के भारतीय ग्राहक ४००० रुपयांहून कमी किमतीचे स्मार्टफोन विकत घेतात. तर ६० टक्के भारतीय ग्राहक २००० रुपयांहून कमी किमतीचे स्मार्टफोन पसंत करतात. यातील अधिक इंटरनेट युजर नसतात. आम्ही पहिल्यांदा या श्रेणीतील ग्राहकांना इंटरनेटची सुविधा देऊ इच्छितो. आम्हाला आशा आहे की सर्व काही ठीक राहिले तर आम्ही फेब्रुवारीच्या अखेरीस या योजनेत यशस्वी होऊ.
सहा महिन्यांपूर्वी देशातील अनेक टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत डाटाविंडने टायअप केले असून डाटाविंडने दक्षिणेत युनिवर्सल, उत्तर आणि पश्चिमेत स्पाइटसोबत टायअप केले होते. तर पूर्वेकडे त्यांनी स्वत:चे डिस्ट्रिब्युशन सेट अप उभे केले आहे.