जगातील सर्वात मोठा टोमॅटो

tomato
गेली दोन दशके सतत सुरू असलेल्या संशोधनातून जगातील सर्वात मोठया टोमॅटोची जात विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. अमेरिकन संशोधक पॉल थॉमस यांनी १५ वर्ष या संशोधनासाठी खर्च केली मात्र दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे अपुरे काम पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी इंग्लंडमधील संशोधक सायमन क्रॉफर्ड यांना निमंत्रित करण्यात आले आणि अखेर सायमन यांनी असा टोमॅटो विकसित करण्यात यश मिळविले असे समजते..

सायमन यांनी विकसित केलेल्या या विशालकाय टोमॅटोचे झाड सहा फुटांपर्यंत उंच वाढते. या टोमॅटोचा आकार सर्वसाधारण टोमॅटोच्या १२ पट मोठा असून हा एक टोमॅटो चार जणांच्या सॅलड म्हणजे कोशिंबिरीची गरज पूर्ण करू शकतो. सँडविच अथवा पूर्ण बर्गर या टोमॅटोच्या १ तुकड्याने पूर्ण कव्हर करता येते. अर्थात झाडाला लागलेल्या टोमॅटोमुळे झाड वाकू नये म्हणून या झाडांना आधारही द्यावा लागतो. ब्रिटनमध्ये हा विशालकाय टोमॅटो नुकताच लाँच केला गेला आहे.

Leave a Comment