गुगलची डूडलद्वारे प्रजासत्ताक दिनानिमित्त सलामी

google
नवी दिल्ली : भारतवासियांना प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने डूडलद्वारे शुभेच्छा दिल्या असून गुगलने होमपेजवरील डूडलमधून भारताच्या विविधतेतील एकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करताना गुगल डूडलमध्ये दाखवले असून शिवाय राजपथाच्या चहूबाजूंना फुलांनी सजवले आहे. डूडलमध्ये इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवन या दोन महत्वाच्या वास्तूंना स्थान दिले आहे.

भारतातील विविध राज्यातील पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले स्त्री-पुरुष दाखवले आहे. भारतीय परंपरा मांडण्याचा या डूडलद्वारे गुगलने प्रयत्न केला आहे.

Leave a Comment