इंटरनेट वापरात चीनची आघाडी !

china
बीजिंग : आता दिवसेंदिवस चीनमध्ये इंटरनेट वापरणा-यांची संख्या वाढू लागली असून सध्याला चीनमध्ये इंटरनेट वापरणा-या लोकांची संख्या ही तब्बल ६४ कोटी ८० लाखांच्या घरात गेली आहे. म्हणजे ६५ कोटी वापरकर्त्यांनी इंटरनेट वापरायला सुरुवात केली आहे. गतवर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यांतच या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे. या संख्येत जवळपास एक कोटी साठ लाख लोकांची वाढ झाली आहे. इंटरनेट वापरण्यामध्ये आता चीन जगात अव्वलस्थानी आहे.

चीनच्या इंटरनेट नेटवर्क सूचना केंद्राचे उपनिदेशक जिन जियान यांनी सांगितले की, चीनमधील घरगुती उत्पादनात ऑनलाईन क्षेत्रात सात टक्क्यांची भागीदारी आहे. मागील वर्षी ही टक्केवार ३.३ होती. बीजिंग डेलीला दिलेल्या माहितीनुसार जिन ने म्हटले आहे की, ७० टक्क्यांपेक्षा अधिक इंटरनेट वापरणारे हे सुरक्षेच्या दृष्टीने चिंतीत आहेत. कारण इंटरनेटवरील टाडा चोरीचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. आपली गुप्ता उघड होण्याचेही प्रमाण वाढले आहे. सार्वाधिक इंटरनेट वापरणारे नागरिक हे आपल्या स्मार्टफोनच्या माध्यामतून याचा वापर करतात. यातून ऑनलाईनवर खर्च करण्यास येथील लोक उत्सुक आहेत.

Leave a Comment