घरच्या बाजारातही कमी होऊ लागला सॅमसंगचा दबदबा

samsung
सेऊल : जगातील अव्वल स्मार्टफोन विक्रेत्या सॅमसंगला चीन, भारतासारख्या बाजारपेठांमध्ये तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत असताना आता दक्षिण कोरिया या आपल्या घरच्या बाजारातही दबदबा कमी होऊ लागला आहे.

दक्षिण कोरियात सॅमसंगच्या बाजारहिश्श्यावर अमेरिकन अॅपलने थेट डल्ला मारत नोव्हेंबरमध्ये विक्रमी ३३ टक्के बाजारहिश्श्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याच वेळी एकहाती सत्ता असलेल्या सॅमसंगचा या बाजारपेठेतील हिस्सा ६० टक्क्यांवरुन ४६ टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सॅमसंगने ६० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा राखला होता. याबरोबरच जपान, चीन या बाजारपेठांमध्येही अॅमपलकडून स्वदेशी कंपन्यांना आव्हान मिळत आहे.

अॅपलने काही महिन्यांपूर्वी बाजारात आणलेली ‘आयफोन ६’ ही नव्या फोनची मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परदेशी ब्रँडमध्ये अॅजपलने आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक हिस्सा अर्जित केलेला असल्याचे हाँगकाँग येथील बाजार विश्लेषक कंपनी काऊंटरपॉइंटने नुकत्या प्रसिद्ध केलेल्या मासिक अहवालात म्हटले आहे.

या देशात अॅेपलचा आतापर्यंतचे सर्वात मोठ्या स्क्रीनचे आयफोन ६ आणि आयफोन प्लस या फोनच्या विक्रीसाठी नोव्हेंबर हा पहिलाच पूर्ण महिना ठरला. सप्टेंबरमध्ये सॅमसंगने लाँच केलेल्या गॅलॅक्सी नोट ४ फॅब्लेटला त्याचा फटका बसला. अॅचपलचा शेअर नोव्हेंबरमध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढला आहे.

Leave a Comment