सूर्याचे दहा करोडवे छायाचित्र घेतले नासाच्या दुर्बिणीने

solar
वॉशिंग्टन – सूर्याचे दहा करोडवे छायाचित्र अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘सोलार डायनॅमिक्स ऑब्जर्वेटरी’ या अत्याधुनिक दुर्बिणीने घेतले असून हे एक विशेष छायाचित्र ठरल्याने सामान्य नागरिकांसाठी ते प्रसिद्ध करण्यात आले आहे.

१९ जानेवारीला हे दहा करोडवे छायाचित्र अंतराळात सूर्याच्या हालचालींवर देखरेख ठेवण्याचे काम करणार्यान एसडीओच्या ‘ऍडव्हान्स इमेजिंग असेंब्ली’च्या माध्यमातून घेण्यात आले आहे. या छायाचित्रासोबतच नासाने एक निवेदन जारी केले असून त्यानुसार, सूर्याची एकूण आठ छायाचित्रे घेण्यात आली आहेत. त्यासाठी चार टेलिस्कोप्सचा वापर करण्यात आला आहे. एसडीओ प्रत्येक दिवशी सूर्याची ५७ हजार सहाशे छायाचित्रे नासाकडे पाठवते. ही छायाचित्रे आणि इतर माहिती मिळून एसडीओ दररोज दिड टेराबाईट्सचा डाटा पृथ्वीवर पाठवते. सौर ऊर्जेत होणारी घट-वाढ, सौर वातावरणात होणारे स्फोट यासह इतर बदलांची माहिती नियमितपणे पृथ्वीवर पाठविली जाते.

नासाने ‘एसडीओ’ ही निरीक्षण यंत्रणा ११ फेब्रुवारी २०१० रोजी अंतराळात पाठविली होती. त्यानंतर आतापर्यंत यंत्रणेने सूर्याची अतिशय अद्‌भूत छायाचित्रे पाठविली आहेत. या छायाचित्रांच्या माध्यमातून सौर मंडळ आणि सूर्याच्या तापमानातील फरक, सौर विस्फोट आणि सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात सातत्याने होणारी वाढ या विषयांचा अभ्यास करण्यात येत आहे.

Leave a Comment