‘व्हॉटसिम’मुळे व्हॉट्सअॅप लाईफ टाईम फ्री !

what-sim
मुंबई: व्हॉट्स अॅप या मॅसेजिंग अॅपने जगभरात सध्या धुमाकूळ घातला असून मोबाईलवर वापरण्यात येणारे व्हॉट्स अॅप आता कॉम्प्युटरवरही वापरणे शक्य झाले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉट्स अॅपमुळे अँड्रॉईड मोबाईलवर मॅसेज करणे अगदी सोप झाले. मात्र आता एक असे सिमकार्ड आले आहे, ज्यामुळे इंटरनेटशिवाय व्हॉट्स अॅप वापरता येणार आहे.

या सिमचे नाव ‘व्हॉटसिम’ असे आहे. साधारणता ७०० रुपये अशी या सिमकार्डची किंमत आहे. हे खरेदी केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्स अॅप लाईफ-टाईम फ्री उपलब्ध होईल. यासाठी ना कोणता रिचार्ज, ना कोणता इंटरनेट पॅक अॅक्टिव्ह करणे आवश्यक. तुमच्या मोबाईलवर इंटरनेट नसेल, तरीही या सिमकार्डमुळे तुम्ही व्हॉट्स अॅप वापरू शकाल. सध्या जगभरातील १५० देशांमध्ये हे सिम उपलब्ध करण्यात आले आहे. या सिमचा शोध झिरोमोबाईलचे संस्थापक आणि जगातील पहिल्या स्मार्टवॉच ‘आय वॉच’ची निर्मिती करणारा मॅन्यूअल झानेला यानेच लावला आहे.

Leave a Comment