रिलायन्स जिओच्या एंट्रीने मोबाईल इंटरनेट होणार स्वस्त

reliance
नवी दिल्ली- इंटरनेट डेटाचे दर रिलायन्स जिओच्या एंट्रीने ४० टक्क्यांपर्यंत खाली येतील. दूरसंपर्क कंपन्या हे दर येत्या १२-१८ महिन्यांमध्ये कमी करतील, अशी शक्यता ब्रॉडबँड अॅंक्सेस अँड नेटवर्क सोल्युशन्स पुरवठादार यूटीस्टारकॉमने व्यक्त केली.

एमटीएनएल-बीएसएनएल या सरकारी कंपन्यांबरोबरच एअरटेल, रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एसएसएलटीसारख्या कंपन्यांचा यूटीएसस्टारकॉमच्या ग्राहक यादीत समावेश असून मर्यादित स्पेक्ट्रममुळे किमती वाढत आहेत. ही जगभरातील समस्या आहे. भारतामध्ये येत्या १२-१८ महिन्यांमध्ये डेटा दर ४० टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतील. नव्या कंपन्यांच्या प्रवेशाने हे साध्य होणार असल्याचे यूटीस्टारकॉम इंडियाचे सहमहाव्यवस्थापक वाय. शहा यांनी सांगितले.

Leave a Comment