नॉदर्न लाईटस- निसर्गाचा चमत्कार

finland
प्रवासाला जावे तर वाटते पण नवीन सारखे काय पाहणार असा प्रश्न असेल आणि थोडी पैसे खर्चायचीही तयारी असेल तर तुम्हाला निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहता येईल. जगाच्या पाठीवर कांही देश असे आहेत की जेथे रात्री अंधार्‍या नसतात तर त्या अतिशय कलरफुल असतात. अर्थात ही निसर्गाची किमया पाहण्यासाठी नॉर्वे, कॅनडा, आईसलँड या देशांची भेट घ्यावी लागेल.

पृथ्वीवरील धुलीकण आणि सूर्याची किरणे ठराविक भागात एकमेकांवर आदळल्यामुळे हे अद्भूत रंगाचे प्रकाशकिरण तयार होतात तेही बहुतेक हिवाळ्यात. अर्थात रात्रीच्या वेळी त्यांची शोभा अभूतपूर्व अशी असते. हवेतील कोणत्या वायूबरोबर सूर्यकिरणांची टक्कर होणार त्यावर या लाईटचा रंग ठरतो. पिवळसर हिरवा हा कॉमन रंग ऑक्सिजनच्या कणांबरोबर सूर्यकिरणांची धडक झाली की निर्माण होतो असे विज्ञान सांगते. लॉन्झेनबर्गपासून थोड्या दूर असलेल्या गांवात तर या प्रकाशाचे नृत्यच पाहायला मिळते

नॉर्वेतील टॉम्सो शहर आणि लॉन्झेनबर्गपासून थोडे दूर असलेले एक ठिकाण या नॉदर्न लाईटससाठीचा हॉट स्पॉट आहे. येथे रात्र उतरायला लागली की हे कलरफूल लाईट आपला करिश्मा दाखवू लागतात. टॉम्सी शहरात त्यांचा शोही असतो. म्हणजे एकीकडे हे सुंदर शहर पाहायचे आणि त्याचवेळी या स्वर्गीय प्रकाशात फिरण्याची मजाही लुटायची.
canada

आईसलँड मध्येही हे लाईट दिसतात. मात्र त्यासाठी रायकाझिक पासून तीन तासांचा प्रवास करावा लागतो. हा देशातील ग्रामीण भाग असून तेथे हे लाईट पाहण्यासाठी रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था आहे. गोठविणारी प्रचंड थंडी असली तरी हॉटेलमध्ये बसल्याबसल्या खिडकीतून हे लाईट पाहता येतात.

कॅनडातही ऐन हिवाळ्यात पिवळा, हिरवा, गुलबक्षी आणि निळ्या रंगांचे मिश्रण असलेले लाईट अगदी हॉटेलातूनही दिसतात. कॅनडातील युकोन येथे त्यासाठी मुक्काम टाकायला हवा. फिनलंडमध्येही हा नजारा पाहता येतो. त्यासाठी ऐन हिवाळ्यात गोठविणार्‍या थंडीची पर्वा न करता सारीसेल्को येथे जावे लागते.

एक महत्त्वाचे म्हणजे हे लाईट हिवाळ्यात दिसतात हे खरे असले तरी त्यासाठी योगही जबरदस्त असावा लागतो. हवा स्वच्छ असेल तर त्यांचा नजारा डोळे दिपवितो अन्यथा दिवसेदिवस प्रतीक्षा करून प्रकाशाची एक शलाकाही पाहण्यास मिळत नाही. हे लक्षात ठेवूनच हा दूरचा प्रवास आखावा.

Leave a Comment