शाळा प्रवेशाची वयोमर्यादा निश्चित!

school
मुंबई : शाळा प्रवेशाबाबतचे किमान वय राज्य सरकारने निश्चित केले असून राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भात जीआर काढून हा निर्णय कळवला आहे. यामधील तरतुदींनुसार विद्यार्थ्यांच्या पहिलीमधील प्रवेशासाठी वयाची मर्यादा ही ६ वर्षे एवढी निश्चित करण्यात आली आहे.

इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत पाच वर्ष पूर्ण झालेले बालकही पात्र असणार आहे. तर प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी साडेतीन वर्षांची वयोमर्यादा निश्चित केली आहे. २०१५-१६ या वर्षांसाठीची प्रवेश प्रक्रिया अनेक ठिकाणी संपल्याने या नव्या वयोमर्यादेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.

राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या सीबीएससी, आयसीएसई शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वेगवेगळी वयोमर्यादा ग्राह्य धरुन प्रवेश दिले जातात. मात्र पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेश करण्यासाठी वयाची अट सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेमध्ये एकवाक्यता आणण्यासाठी सरकारकडून शिक्षण संचालकाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने दिलेल्या शिफारसींनुसार हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे.

Leave a Comment