आता व्हॉट्सअॅपची मज्जा डेस्कटॉपवरही

whatsapp
मुंबई : व्हॉट्सअॅप युझर्ससाठी एक खुशखबर असून या अॅप्लिकेशनची मज्जा आजपर्यंत आपण स्मार्टफोनवर घेत होतों पण आता व्हॉट्सअॅपचा वापर डेस्कटॉपवरही करायला मिळणार आहे.

जगभरात व्हॉट्सअॅप इंस्टंट मेसेजिंग अॅप म्हणून प्रसिद्ध असून या अॅप्लिकेशनच्या वापरकर्त्यांची संख्या ५० कोटींच्या पार पोहोचली आहे, यावरुनच त्या अॅपच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो. व्हॉट्सअॅप वापरकर्ते बऱ्याच काळापासून ही सेवा डेस्कटॉपवर करण्याची मागणी करत होते. आता व्हॉट्सअॅपने युझर्सना ही भेटही दिली आहे.

व्हॉट्सअॅपने नवी सेवा ‘व्हॉट्सअॅप वेब’ लॉन्च केली आहे. व्हॉट्सअॅपचे संस्थापक जेन कॉम यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे ही, “आजपासून पहिल्यांदाच लाखो युझर्स आता हे अॅप वेब ब्राऊजरवर वापरु शकतात. व्हॉट्सअॅप वेबवरही युझर्स फोनमधील मेसेज वाचू शकतात. याचा अर्थ असा की, युझर्सचे मेसेज ब्राऊजरसह फोनवरही उपलब्ध असतील.”

डेस्कटॉप व्हॉट्सअॅप सुरु करण्यासाठी युझर्सना गूगल क्रोम ब्राऊजरमध्ये https://web.whatsapp.com ही लिंक ओपन करावी लागेल. त्यानंतर एक QR कोड स्कॅन युझरच्या डेस्कटॉप स्क्रीनवर दिसेल, ज्याद्वारे युझर मोबाईल व्हॉट्सअॅप स्कॅन करु शकतात. यासाठी युझरकडे व्हॉट्सअॅपचे अपडेटेड व्हर्जन असणे आवश्यक आहे. मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपच्या मेन्यूमध्ये जाऊन ‘व्हॉट्सअॅप वेब’ ऑप्शनमध्ये गेल्यावर युझर हा कोड स्कॅन करुन सहजरित्या डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा वापर करु शकतील.

व्हॉट्सअॅप वेबचा सध्या अँड्रॉईड, ब्लॅकबेरी आणि विंडोज फोन वापरकर्ते आनंद घेऊ शकतात. डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा वापर करण्यासाठी युझरचा फोन इंटरनेटशी कनेक्ट असणे गरजेचे आहे. अॅपल आयफोन युझर डेस्कटॉपवर गूगल क्रोमशिवाय दुसरे ब्राऊजर वापरत नसतील तर त्यांना व्हॉट्सअॅप वेब वापरता येणार नाही.

Leave a Comment