२८ जानेवारीला येणार शाओमीचा एमआय ४

mi4
दिल्ली : भारतात चीनी मोबाईल कंपनी शाओमीचा एमआय ३ धुमाकूळ घालत असतानाच आता येत्या २८ तारखेला भारतात लाँच होण्यासाठी एमआय ४ सज्ज झाला आहे.

एमआय ४ च्या भारतातील लाँचिंगबाबत शाओमी कंपनीच्या उपाध्यक्षांनी घोषणा केली असून याच वेळी एमआय ४ मध्ये वेगळ्या फीचर्सचा अंतर्भाव करण्यात आल्याची माहितीही शाओमीच्या भारतातील प्रमुखांनी दिली. एमआय ४ मध्ये २.५ गीगा हर्ट्झ क्वॉलकॉम स्नॅप ड्रॅगन ८०१ प्रोसेसर असून ३ जीबीचा रॅम आहे. १६ जीबी इनबिल्ट मेमरी असून ६४ जीबी एक्स्पांडेबल मेमरी आहे. पाच इंचांचा फुल एचडी डिस्प्ले हे फोनचे वैशिष्ट्य मानावे लागेल. एमआय ४ ला फ्रंट कॅमेरा आहे, तर यात ४.४.३ किटकॅट व्हर्जन असणार आहे. शाओमी एमआय ४ फक्त फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे, मात्र फोनच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.

Leave a Comment