आयफोन सेव्हन बाबतचे अंदाज व्यक्त

iphone
नवी दिल्ली – आयफोन सिक्स आणि सिक्स प्लस बाजारपेठेत दाखल होऊन थोडेच दिवस उलटत आहेत, तोवरच आयफोनचा पुढचा फोन आयफोन सेव्हन किंवा आयफोन सिक्स एस कसा असेल याचे वर्णन करणार्या अफवा आत्ताच पसरू लागल्या आहेत. इंटरनेटवरून या चर्चेला उत आला असतानाच व्हॅल्यूबॅक डॉट कॉम या वेबसाईटवर आयफोन सेव्हनची माहिती दिली गेली आहे.

अॅपलचा नवा आयफोन खूपच अॅडव्हान्स असणार याची खात्री देतानाच त्याची पॉवर चांगली असेल, बॅटरी बॅकअप वाढविला गेलेला असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आयफोन सिक्स व प्लसप्रमाणेच याचा स्क्रीन 4.7 अथवा 5.5 इंची असेल तसेच त्याला कर्व्हड डिस्प्ले स्क्रीन आणि सफायर ग्लास डिस्प्ले दिला जाईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. आयफोन सिक्स व प्लसला 1 जीबीचा रॅम होता मात्र नवीन फोनमध्ये तो 2 जीबीचा असेल जेणेकरून युजरला मल्टीटास्कींगसाठी त्याचा उपयोग होऊ शकेल असे तज्ञांचे मत आहे. या फोनसाठी किमान स्टोरेज 32 जीबी असणार आहे असेही सांगितले जात आहे. आयफोन सिक्स आणि प्लससाठी 16 जीबी,64 व 128 जीबी स्टोरेज दिले गेले होते.

Leave a Comment