नवी दिल्ली – अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संस्थेची गुपिते चव्हाटयावर आणून रशियात आश्रय घेतलेल्या स्नोडेनने तो आयफोनचा वापर कधीच करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याच्यामते आयफोनमध्ये स्पेशल सॉफ्टवेअर अक्टीव्हेट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे युजरला न कळतच, अथवा युजरने कोणतेही बटन न दाबताही त्याची सर्व माहिती गोळा करता येते. यामुळे स्नोडेन नेहमीच अतिशय साधा फोन वापरण्यास प्राधान्य देतो. स्नोडेनच्या म्हणण्यानुसार ब्रिटीश एजन्सी जीसीएचओ या अॅपचा वापर युजर ट्रॅक करण्यासाठी करते.
स्नोडेन सांगतोय आयफोन वापरातील धोका
स्नोडेनच्या वकीलाने या संदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले, आयफोन आज जगभरात लोकप्रिय आहेत मात्र त्याच्या विकसकांनी हे फोन तयार करताना फोनच्या आयओएसमध्येच असे सॉफ्टवेअर लोड केले आहे की जे आपोआप अॅक्टीव्हेट होते. साडेसात वर्षांपासून हेे सॉफ्टवेअर वापरात असून ते नुकतेच उघडकीस आले आहे.या सॉफ्टवेअरमुळे युजरची सर्व संवेदनशील माहितीही गोळा केली जाऊ शकते तीही युजरच्या न कळत. त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव स्नोडेन आयफोनचा वापर करत नाही.