युरोपीयन्सनी उठवली हापूस आंब्यावरील बंदी

mnago
मुंबई : अखेर हापूस आंब्याचा गोडवा युरोपीयन्सना कळला असून गेल्या वर्षी एप्रिलमध्ये देशात घालण्यात आलेली हापूस आंब्यावरील बंदी उठवण्यात आली आहे.

फळमाशी आढळल्याने युरोपीयन संघाने हापूस आंबा आणि आणि भाज्यांवर यावर बंदी घातली होती. ज्या भाज्यांना युरोपात बंदी घालण्यात आली होती, त्यामध्ये कारली, दोडका, वांगी यांचा समावेश होता. युरोपीयन संघाच्या या निर्णयामुळे भारतातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील हापूस आंबा उत्पादकांना फटका बसला होता. ब्रिटनमध्ये दरवर्षी भारतातून जवळपास दीड कोटी आंब्यांची आयात होते. ही उलाढाल साधारण ६ लाख पौंडांची असते.

Leave a Comment