मुलांवर चाप ठेवणारे इग्नोअर नो मोअर अॅप

ignore
जगभरातील पालकांना आपल्या मुलांची वाटणारी काळजी सारख्याच स्वरूपाची असते. मोबाईल क्रांतीमुळे पालकांना मुलांना लगेच फोन लावून त्यांची हालहवाल विचारणे सहज सुलभ झाले असले तरी मुले ही पालकांचे बाप असतात व अनेकदा पालकांचे फोन ते घेतच नाहीत ही समस्याही जगभरात सगळीकडे सारखीच आहे. याचा वारंवार अनुभव घेणार्‍या व त्यामुळे अतित्रासलेल्या शेरॉफ स्टैडिफर्ड या पालकाने मुलांना चाप बसविणार्‍यासाठी चक्क एक अॅप तयार केले आहे. त्याचे नावच मुळी इग्नोअर नो मोअर असे आहे. शेरॉन यांनी अॅप कसे बनवायचे याची माहिती इंटरनेटवरून घेतली असेही समजते.

हे अॅप अँड्राईड फोनवर चालते. अॅप डाऊन लोड करून घ्यायचे आणि युजर मुलाचे नाव व एक चार अंकी कोड टाईप करायचा. पालकांचा अथवा अन्य सिलेक्टेड नंबरचा आलेला फोन मुलांनी उचलला नाही तर मुलांचा फोन अॅटोमॅटिक लॉक होतो. जोपर्यंत मुले पालक अथवा सिलेक्टेड नंबरवर कॉल करत नाहीत तो पर्यंत फोन लॉक राहतो. मुलांनी फोन केल्यानंतर त्यांना पालक जेव्हा चार आकडी पासवर्ड सांगतील तेव्हाच मुलाना दुसर्‍या कोणाला फोन करणे शक्य होते. हे अॅप अॅमेझॉनवर विक्रीसाठी असून त्याची किंमत आहे ५.९९ डॉलर्स म्हणजे ७३० रूपये. हे अॅप आयफोनसाठी मार्चपासून उपलब्ध होणार आहे.