नवी दिल्ली : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणातर्फे दर तीन वर्षांनी वाघांची गणना केली जाते. त्यानुसार देशात गेल्या तीन वर्षांत वाघांची संख्या तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचे ताज्या आकडेवारीवरून समोर आले असून यातल्या आकड्यांनुसार, २०११ मध्ये १ हजार ७०६ वर असलेली वाघांची संख्या यंदा थेट २ हजार २२६ वर पोहोचली आहे.
देशाच्या व्याघ्रसंख्येत वाढ!
वाघांची एकूण संख्या १ हजार ७०६ असल्याचे वर्ष २०१० मध्ये आढळून आले होते. २००६ मध्ये वाघांची संख्या तर चिंतेचा विषय बनली होती. यावेळी, त्यांची संख्या १ हजार ४११ इतकी आढळली होती. पण, त्यानंतर मात्र घटत जाणाऱ्या वाघांच्या संख्येचा विषयावर जनजागृती करण्यात आली. २०१४ मध्ये वाघांच्या संख्येचा रिपोर्ट जाहीर करताना पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘सफलतेची गाथा’ असा याचा उल्लेख केला असून जगभरात वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना भारतात मात्र ही संख्या वाढते आहे.