खिमा, पापड आणि करी लिफ आता इंग्रजी शब्द

khima
भारतील पदार्थांनी मिळविलेली जागतिक लोकप्रियता आणि त्यातही भारतीय रांधणपद्धतीत वारंवार उपयोगात आणले जाणारे शब्द यांना ही जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. जगभरात विशेष मान्यता असलेल्या ऑक्सफर्डच्या अॅडव्हान्स लर्निंग डिक्शनरीच्या ९ व्या आवृत्तीत खिमा, पापड हे शब्द इंग्रजी शब्द म्हणून नोंदले गेले आहेत.

ऑक्सफर्ड डिक्शनरी विभाग प्रमुख पॅट्रीक व्हाईट या संदर्भात म्हणाले की यंदा २४० भारतीय शब्द या डिक्शनरीत इंग्रजी शब्द म्हणून समाविष्ट झाले आहेत. त्यातील अनेक शब्द हे भारतीय पदार्थ तयार करताना वापरले जाणारे शब्द आहेत. खिमा, पापड, करी लिव्ह म्हणजे कढीपत्ता हे त्यातील कांही शब्द आहेत. इंग्रजी ही जगाची भाषा आहे त्यामुळे तिच्यावर जगाचा प्रभाव आहे. भारतीय पदार्थ जगात मान्यता आणि लोकप्रियता मिळवून आहेत त्यामुळे त्यात वारंवार वापरले जाणारे शब्द जगातही प्रसिद्ध व्हावेत, ते जगभर वापरले जावेत म्हणून ते डिक्शनरीत समाविष्ट केले गेले आहेत.