एचटीसी त्यांचा नवा फ्लॅगशीप स्मार्टफोन एचटीसी वन एम नाईन बार्सिलोनात २ ते ५ मार्च दरम्यान भरणार्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंसमध्ये सादर करणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. लास वेगास येथील कंझ्युमर इलेक्ट्रोनिक शो नुकताच संपला असताना आता मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१५ मध्ये कोणती नवी गॅजेट येतील याचे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. त्यात सॅमसंग गॅलेक्सी एस सिक्स सादर होईल असेही कांही सूत्रांकडून समजते. त्याचबरोबर एचटीसी जो नवीन फोन सादर करणार आहे तो एम नाईनच असेल अशीही खात्री दिली जात आहे.
एचटीसीचा एम नाईन स्मार्टफोन लवकरच येणार
या स्मार्टफोनसाठी अपग्रेडेट फिचर्स दिली जातील. पाच इंची स्क्रीन, फुल एचडी डिस्प्ले, २० एमपीचा रियर तर १३ एमपीचा फ्रंट कॅमेरा, तीन जीबी रॅम, अँड्राईडचे लेटेस्ट व्हर्जन ५.० लॉलीपॉप यात असेल. शिवाय एड्रिनो ४३० ग्राफिक प्रोसेसरही त्याला दिला जाईल. त्यामुळे एचडी गेमिंग आणि हेवी ग्राफिक्स युजरला सुलभतेने वापरता येतील.