लवकरच चहाच्या टप-यावर ‘वाय-फाय’ फुकटात !

wifi
मुंबई : मुंबईसह देशभरात येत्या काही दिवसांतच चहाच्या टप-यावर चहासोबतच फुकटात वाय-फायही मिळणार आहे. २०१६ पर्यंत देशभरातील चहाच्या टप-यांवर सर्वच सार्वजनिक ठिकाणी ही सुविधा ‘मुफ्त इंटरनेट’ ही संस्था सुरू करणार आहे.

५० जण ३० दिवसांसाठी साधारणत: ५०० रुपयांत एकदा इंटरनेट अ‍ॅक्सेस करू शकतात. म्हणजेच इंटरनेट अ‍ॅक्सेससाठी प्रत्येकी १० रुपये मोजावे लागतात. पण ‘मुफ्त इंटरनेट’ ने हे पैशाचे जाळे भेदून, सार्वजनिक ठिकाणी फुकटात ‘इंटनेट अ‍ॅक्सेस’ पुरविण्याचा चंग बांधला आहे. चहाच्या टप-या, कॅफेज, शाळा, रुग्णालये, रेल्वे स्टेशन्स यासारख्या सर्व सार्वजनिक ठिकाणी इंटरनेट फुकटात वापरता येईल.

ना नोंदणी शुल्क, ना डेटा फी हे फुकटात नेहमी इंटरनेट सेवा देईल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी फक्त मुफ्त वाय-फाय अकाऊंट क्रिएट करायचे आहे. ते झाल्यानंतर तुम्ही कुठेही, कधीही फुकटात इंटरनेट वापरू शकाल, असे ‘मुफ्त इंटरनेट’ चे सहसंस्थापक विपुल पटेल यांनी सांगितले. ‘मुफ्त इंटरनेट’ ही सेवा प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्था जोमाने कामाला लागली आहे. सध्या ८५ टक्के भारत ‘ऑॅफलाईन’ आहे. अनेक लोक याबाबत अद्याप जागृत नाहीत. मात्र फ्री इंटरनेमुळे जनतेला त्यांचा हक्क मिळेल आणि ते जगासोबत येतील, असे पटेल यांचे म्हणणे आहे.

‘मुफ्त इंटरनेट’ हे सरकारी अ‍ॅथोरिटी, उद्योग तज्ज्ञ आणि सिलीकॉन वॅली गुंतवणूकदारांसोबत मिळून ही सुविधा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी काम करीत आहे. काही कॅफे, रेस्टॉरंट मोफत वाय- फाय पुरवत असल्यामुळे, त्यांचा बिझनेस वाढला आहे. मात्र आता ‘मुफ्त इंटरनेट’ च्या माध्यमातून चहाच्या टप-यांवरही मोफत इंटरनेट पुरविले, तर लोक तिकडेही धाव घेतील. त्यामुळे त्यांचाही बिझनेस वाढू शकेल, असे नेहा रांभिया या माजी ‘आयआयटीयन्स’ ने म्हटले आहे.

Leave a Comment