आरोग्याच्या बाबतीत गुजरातमध्ये बेजबाबदारपणा

hiv
अहमदाबाद : एकीकडे मेडिकल टुरिझम हब म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरात ओळख निर्माण करण्याची धडपड करत असले तरी याच गुजरातमध्ये आरोग्याच्या बाबतीतील बेजबाबदारपणा समोर आला असून गेल्या सहा वर्षात रक्ताच्या आदान-प्रदानातून, तब्बल २५०० जणांना गुजरातमध्ये एचआयव्हीची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती अधिकाराअंतर्गत खुद्द आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

२०१३ मध्ये रक्ताच्या आदान-प्रदानामुळे एचआयव्हीची बाधा झालेल्यांची संख्या २७१ होती. देशात याबाबतीत गुजरात अव्वल क्रमांकावर आहे. पण गेल्या सहा वर्षातील हा आकडा २५०० च्या वर आहे. बेजबाबदार आरोग्य विभाग आणि ब्लड बँकेच्या निष्काळची व्यवस्थापनामुळेच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती अधिकारांतर्गत माहिती देताना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO) आणि आरोग्य मंत्रालयाने २००८ ते २०१३ दरम्यानची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार गुजरातमध्ये २००८ साली १९२, २००९ मध्ये ५६३ आणि २०१३ मध्ये २७१ जणांना रक्ताच्या आदान-प्रदानातून एचआयव्हीची बाधा झाल्याची धककादायक माहिती समोर आली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment