भारतीय चिमुरडीने जिंकली २४ लाखांची ज्युवेलरी

dubai
दुबई- येथे सुरू असलेल्या शॉपिग फेस्टीव्हलमधील लकी ड्रा मध्ये केवळ २८ दिवसांची असलेल्या भारतीय चिमुरडीने २४ लाख रूपये किमतीचे सोने हिर्‍यांचे दागिने जिंकले आहेत. तिला १ लाख ४० हजार दिर्हॅिमचे दागिने मिळाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नितेरा जनार्दन असे या कन्येचे नाव आहे. केरळमध्ये जन्माचा सोहळा २८ दिवस पाळला जातो. त्यामुळे नितेराचे वडील अनिल यांनी तिच्या जन्मानंतर सोने चेन आणि कड्यांची खरेदी केली.२००० दिर्हॅममचे हे दागिने त्यांनी लेकीसाठी खरेदी केले.२० व्या दुबई शॉपिग फेस्टीव्हलमध्ये काढण्यात आलेल्या लकी ड्रामध्ये नितेराची निवड झाली आणि तिला २४ लाख रूपये किमतीचे दागिने बक्षीस मिळाले. अनिल यांना याविषयीचा फोन आला तेव्हा त्यांना प्रथम ती चेष्टाच वाटली पण नंतर त्यातील सत्यता त्यांच्या अनुभवास आली.

यावेळी जाहीर झालेल्या विजेत्यांत विनय वर्गीस या आणखी एका भारतीयाचाही समावेश असून त्यांना ११००० दिर्हॅीमची सोन्याची अंगठी बक्षीस मिळाली आहे. एका यूएईच्या नागरिकालाही यात तिसर्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.