नासा आणि निस्सान बनविणार स्वतःच चालणारी कार

nasa
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि जपानी ऑटोमेकर निस्सान यांनी स्वतःच चालू शकणारी कार बनविण्यासाठी परस्पर सहकार्याचा करार केला असून या कारच्या चाचण्या या वर्षअखेरी घेतल्या जाणार असल्याचे समजते.

निस्सानच्या यूएसमधील सिलीकॉन व्हॅलीतील रिसर्च सेंटर मधील संशोधक आणि नासातील संशोधक यांनी या प्रकल्पासाठी पाच वर्षे संशोधन विकास भागीदारीचा करार केला आहे. ते तयार करणार असलेल्या कारचा वापर व्यावसायिक कारणांसाठी तसेच वैयक्तीक वापरासाठीही करता येणार आहे. यामध्ये स्वायत्तपणे चालू शकणारी ड्राईव्ह सिस्टिम, नेटवर्कवर चालणारी अॅप्लीकेशन, सॉफ्टवेअर, अॅनेलिटीकल व्हेरिफिकेशन, रस्ते आणि अंतराळ वाहतूकीसाठी हार्डवेअर सॉफटवेअरचा वापर अशा सर्व बाबी विकसित केल्या जाणार आहेत. ही वाहने मटेरियल, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करू शकतील.

निस्सानचे अध्यक्ष आणि सीईओ कार्लोस गोशन म्हणाले की आमच्यापुढे तसेच नासापुढे असे वाहन तयार करताना कांही आव्हाने समान आहेत. नासाकडे अंतराळ प्रवासाचा अनुभव आहे तर आमच्याकडे रस्ते प्रवासाचा दीर्घ अनुभव आहे. ही वाहने प्लॅनेटरी रोव्हर प्रमाणे ऑपरेट करता येतील. २०१५ च्या अखेरपर्यंत त्यांच्या चाचण्या सुरू होतील.

Leave a Comment