तीन वर्षात नियंत्रणमुक्त होणार युरिया !

yuriya
मुंबई – केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नियंत्रणमुक्त केल्यानंतर आता युरिया खताच्या किंमतीदेखील नियंत्रणमुक्त करण्याची शक्यता असून युरिया खताचा शेतक-यांकडून अवाजवी केला जाणार वापर कमी केला जावा, यासाठी केंद्र सरकारने युरियाच्या किंमती नियंत्रणमुक्त करण्याचे ठरवले आहे.

सरकारने युरिया तीन वर्षात टप्प्याटप्याने नियंत्रणमुक्त करण्याचे संकेत दिले असून येत्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली हे युरिया नियंत्रणमुक्त करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.

युरियाची सध्या सबसिडी ही कंपन्यांना दिली जाते. त्याऐवजी ती आता थेट ग्राहकांना दिली जाणार असल्यामुळे युरियाचे दर महागले तरी त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळेल असे सरकारमधील काहींचे मत आहे.